Jnana Prabodhini Prashala
Instructions


आदरणीय हितचिंतक , ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ' समाज विकासासाठी बुद्धिमंतांचे नेतृत्व विकसन' या उद्दिष्टाने चालविली जाणारी खाजगी विनाअनुदानित प्रशाला आहे. प्रशालेचे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून प्रशाला सरकारी अनुदान घेत नाही. १. अतिशय उपक्रमशील असूनही समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा याकरिता शुल्क तुलनात्मकदृष्टया कमी ठेवलेले आहे. तरीसुद्धा प्रशालेत अनेक विद्यार्थ्यांना शुल्कमाफी द्यावी लागते , ज्यामधे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय काही असेही विद्यार्थी आहेत की आर्थिक अक्षमतेमुळे त्यांना शिष्यवृत्तीही द्यावी लागते. प्रशालेत प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षेतील गुणवत्ता हा एकमेव निकष असतो. त्यामुळेच एकही बुद्धिमान विद्यार्थी या विशेष शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सर्वच प्रकारची मदत विद्यार्थ्यांना पुरविली जाते. सर्वसाधारणपणे एका विद्यार्थ्याचे वार्षिक शालेय शुल्क रु . ४५,००० तर सहनिवास शुल्क रु . ४५ ,००० इतके आहे. गरजू विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नानुसारच शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांचे गट असे केले जातात : 100%शिष्यवृत्ती= १ लाखाखालील उत्पन्न, 80 %.शिष्यवृत्ती= रू १.०० ते १.५० लाख उत्पन्न, 60% शिष्यवृत्ती = रू १.५० ते २.०० लाख उत्पन्न, 40% शिष्यवृत्ती = रू २.०० ते २.५० लाख उत्पन्न , 20% शिष्यवृत्ती = रू २.५० ते ३.०० लाख उत्पन्न. ३ लाखावरील वार्षिक उत्पन्न असल्यास संपूर्ण शुल्क भरावे लागते. यादी आपणास नोंदणी केल्यानंतर पहावयास मिळू शकेल २. शालेय अथवा सहनिवास शुल्काइतकेच महत्त्वाचे म्हणजे शाळेची भौतिक रचना. अत्याधुनिक सादरीकरण उपकरणे, प्रयोगशाळा साहित्य, संगणक या व या सारख्या अनेक वस्तूंच्या खरेदीसाठी आर्थिक मदत लागते. ३. अध्यापक प्रशिक्षण हा आणखी एक महत्त्वाचा विषय. प्रशालेतील अध्यापक अनेक ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी अथवा शोधनिबंध सादर करण्यासाठी जात असतात. यासाठीही आर्थिक मदतीची गरज असते. ४. या शिवाय अन्य काही गोष्टी या सर्वांसाठी आपण वस्तू अथवा रोख देणगीरूपाने मदत करून प्रबोधिनीच्या या कामात सहभागी व्हावे, ही विनंती. ज्ञान प्रबोधिनीस दिलेल्या देणग्या 80G खाली (50%) करमुक्त आहेत. आपण आपले धनादेश ' ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ' या नावाने काढू शकता किंवा देणगी 'ऑनलाईन ' पाठवू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 02024207121/ 22 देणगी 'ऑनलाईन ' पाठविण्यासाठी लिंक याच पानावर आहे देणगी ऑनलाईन पाठविणाऱ्यांसाठी सूचना : १. आपण देणगी विशिष्ट विद्यार्थ्यासाठी अथवा वस्तूसाठी अथवा अन्य कारणांसाठी देऊ शकाल. त्यासाठी जी यादी दिलेली आहे त्यातून विद्यार्थी / विद्यार्थिनी / वस्तू/ गरजेची बाब निवडू शकता. २. कंसामधे अपेक्षित देणगीचा उल्लेख केला आहे पण ती पूर्णपणे द्यावयास हवी असा आग्रह नाही. ३. ऑनलाईन पाठविताना सेवा शुल्क लागू होते. ते देणगीदारांनी भरावे ही विनंती. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड यापेक्षा नेटबँकिंग खूप स्वस्त पडते . ४. पावती लगेचच ईमेलव्दारे पाठविली जाते.

eTechSchool Help?