Gram Vikasan Naisargik Samsadhane Vibhag
Instructions

ज्ञान प्रबोधिनी ग्राम विकसन विभाग हा सुरुवातीपासूनच प्रबोधिनीच्या कामातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये पाणीविषयक काम हा कायमच मध्यबिंदू राहिलेला आहे. पाणलोट क्षेत्र विकासासाठी विहिरी, फेरोसीमेंट टाक्या, माती बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळी, झरे विकास इत्यादी कामे, त्याजोडीने डोंगराळ भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये सौर दिव्यांचा प्रसार, सौर-जैव-पवन ऊर्जेचे विविध प्रयोग व त्याला अलिकडच्या काळात सौर पॅनेल व सौर दिवे जुळणी प्रशिक्षणाची जोड मिळाली आहे. ग्रामीण तरुणांना लेथ मशीन ऑपरेटर व सीएनसी मशीन ऑपरेटरचे प्रशिक्षण, वनवासींच्या उपजीविकेसाठी प्रशिक्षण, शेतीमध्ये आधुनिकता रुजविणे, समजून उमजून शेती करणे, नवनवीन प्रयोगाची माहिती देता येणे यादृष्टीने आस्थापना, असे अनेक प्रकारचे काम प्रबोधिनीद्वारे चालू आहे.

If you are unable find your details or unable to donate, please contact on 020-24207176 in usual working hours or write to gram@jnanaprabodhini.org



eTechSchool Help?